दिनविशेष / राशिभविष्य

0

शके १९४५, शोभननाम संवत्सर, गुरुवार, दि. ८ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण पंचमी, चंद्र- मकर राशीत, नक्षत्र- श्रवण साय. ६ वा. ५९ मि. पर्यंत नंतर धनिष्ठा, सुर्योदय- सकाळी ६ वा. ०२ मि. , सुर्यास्त-   सायं. १९ वा. १४ मि. 

नमस्कार आज चंद्र मकर राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सायं. ७ पर्यंत चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र त्रिकोणयोग व चंद्र – मंगळ प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, सिंह व कुंभ या राशींना प्रतिकूल आहे.

        दैनंदिन राशिभविष्य

मेष-  मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणार घटना घडेल.

वृषभ- नातेवाईक भेटतील. काहींना प्रवास करावा लागेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. मनोबल उत्तम राहील. आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत.

मिथुन – आर्थिक लाभ होतील. कौटूंबिक सौख्य लाभेल. काहींना गुप्तवार्ता समजतील. मनोबल कायम ठेवावे, खचून न जाता कार्यरत रहावे.

कर्क- दैनंदिन कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य सुधारेल. उत्साही राहणार आहात.

सिंह – मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास नकोत. तुमच्या कृतीचा तुम्हाला त्रास होईल.

कन्या- अनपेक्षितपणे काही गाठीभेटी पडतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आथिर्क कमाई होईल. नियोजन योग्य ठरेल. 

तुला – मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. 

वृश्चिक – मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. नातेवाईकांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत.

धनु- मानसिक अस्वस्थता कमी होईल. आर्थिक लाभ होतील.  मनोबल वाढेल. प्रवास आनन्ददायी होणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ उत्तम राहील.

मकर-  तुमचा प्रभाव राहील. उत्साहाने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम असल्याने अनेक कामे यशस्वी करणार आहात. प्रवास होतील.

कुंभ – अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. शांत व संयमी रहावे.

मीन – मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. आरोग्य उत्तम राहील. काहींना विविध लाभ होतील. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४ GARGI JYOTISHAALAYA: गार्गी ज्योतिषालय, सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here