नवचैतन्य हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

0

गोंदवले – दिनांक 25 जून रोजी नवचैतन्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गोंदावले बु || ता. माण येथे इयत्ता ११वी च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दिन उत्साहात पार पडला. सर्व प्राध्यापक वर्गाने प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. ११वी च्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन १२वी च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते तर पाठ्यपुस्तक देऊन प्राचार्य श्री. खांडेकर आर. टी सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

प्राध्यापिका सौ जाधव एस .के मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना ,शालेय शिस्त व कॉलेजच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य श्री. खांडेकर आर.टी सर यांनी कला शाखेची निवड केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षा, सरकारी सेवा,व्यवसाय-उद्योगधंदे, राजकारण व समाजकारण, कलेची विविध क्षेत्रे येथे कला शाखेचे विद्यार्थी कसे यशस्वी वाटचाल करत आहेत यांची उदाहरणे दिली. त्याचबरोबर भरपूर वेळ कलाशाखेतील विद्यार्थ्यांना असतो त्यामुळे वेळेचा सदुपयोग करून भविष्यातील संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. वाचन संस्कृती जोपासावी असे सुचित केले. ज्युनिअर कॉलेजचे स्थापनेपासून आधारस्तंभ असणारे  प्रा.श्री ए. डी पाटील सर यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले करून विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा.श्री कणसे एस.बी सर तर आभारप्रदर्शन प्रा रणपिसे के. एस मॅडम यांनी केले.
छाया – विद्यार्थ्यांचे स्वागत करताना १२ वी चे विद्यार्थी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here