अनिल वीर सातारा : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील भारतीय राज्यघटनेचे उद्देशिका या प्रतिमेची विटंबना एका माथेफिरूने केली. त्यामुळे परभणी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यां मार्फत आंदोलन करण्यात आले. या आवमन घटनेचा निषेध आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहान केली आणि त्यात मारहाणीत शिक्षण घेत असणारा सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइं (ए) जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली वरील मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली.
परभणी येथील आंदोलनानंतर बौद्ध वस्तीत भीम नगर, प्रियदर्शनी नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कोंबीगं ऑपरेशन करून बौद्ध बांधवांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. सोबतच त्यांच्या घराचे मोटरसायकल, कार यांचे नुकसान भाडोत्री गुंडाच्या माध्यमातून पोलिसांनी केले. अनेक निष्पाप नागरिकांना बेकायदेशीररित्या अटक केली. त्यामध्ये महिलांनाही अटक करण्यात आली. तसेच मारहाणही करण्यात आली.
याबाबतचे व्हिडिओ प्रसारमाध्यमाकडे उपलब्ध आहेत. तरीसुद्धा एकंदरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने सोमनाथ वेंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे.आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत.अटकेत असणाऱ्या तरुण-तरुणांची त्वरित सुटका करण्यात यावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावे व संबंधितांवरती मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.