पालखी सोहळ्यात शासकीय योजनांची वारीचा चित्ररथ

0

सातारा, दि. 19, – संतश्रष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोबत केंद्रिय संचार ब्यूरो प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या वतीने 9 वर्षातील केंद्र शासनाच्या विकासकामांची कामगिरी या विषयावर असलेली शासकिय योजनांची वारी हे चित्र रथ सोबत आहेत.

            या वारीमध्ये कला पथक आणि LED स्क्रीनचा माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विकासकामांची, योजनांची व उपक्रमांची माहिती मिळणार आहे. या रथाचे उद्घाटन दिनांक 11 जून रोजी विभागीय आयुक्त पुणे येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून ही वारी रवाना केली. हे रथ संतश्रेष्ठी ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वारीसोबत असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here