कडेगांव दि. 9 (प्रतिनिधी ) आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर चे प्रा. नामदेव पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची मराठी विषयातील विद्यावाचस्पती म्हणजेच पीएच.डी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल आर्टस् ॲड कॉमर्स कॉलेज चे प्र.प्राचार्य डॉ. बापूराव पवार, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा.नामदेव पाटील यांनी ‘मराठी प्रायोगिक नाटक : आशय आणि अभिव्यक्ती’ या विषयावर निवडक नाट्यकृतीच्या अनुषंगाने संशोधन केले आहे. हे संशोधन करीत असताना त्यांना हलकर्णी चंदगड येथिल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या संशोधनात नाटकातून व्यक्त झालेला सामाजिक आशय आणि पात्रांच्या माध्यमातून व्यक्त झालेले समाजदर्शन यांची मांडणी सामाजिक आणि मनोरंजनात्मक अंगांनी नाटकांचा पोत उलगडून दाखविला आहे. त्यांना हे संशोधन करीत असताना शिवाजी विद्यापीठाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. रणधीर शिंदे, प्रो.डॉ. नंदकुमार मोरे यांचे सहकार्य लाभले. त्याच्या या यशाबद्दल शैक्षणिक व समाजिक क्षेत्रातून कौतुक होत असून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.