सातारा : एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील सर्वांचा सर्वांगीण विकास होत असतो.तेव्हा घर म्हणजे प्रेम,आठवणी व आनंदाचे आश्रयस्थान असते.अशा शुभेच्छापर संदेश अनेकांनी व्यक्त केल्या. भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ट मार्गदर्शक नाथा ममता आगाणे (काका) यांचा गृहप्रवेश पाटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. “घर हे स्वतःच हक्काच घर असणे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असते.त्यासाठी प्रत्येकजण मेहनत वर्षानुवर्षे घेत असतो. त्यामुळे मिळणारा आनंद न्याराच असतो.
नातेवाईकसुद्धा आनंदून जातात.” यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,संघटक गणेश कारंडे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पर्यटन सचिव आप्पा अडसुळे, महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर. थोरवडे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,केंद्रीय शिक्षक भागवत भोसले,विद्याधर गायकवाड,नंदकुमार काळे, आबासाहेब भोळे,बाळासाहेब सावन्त,श्री.व सौ. मधुकर (आण्णा) जगधणी, आजी-माजी जिल्हा व तालुका पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका,संपूर्ण आगाणे परिवार,नातेवाईक, मित्रपरिवार, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.