फलटणमध्ये श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा

0

फलटण  :  येथील पुरातन श्रीराम मंदिरात संस्थानकालीन परंपरेनुसार रामनवमीचा रामजन्मोत्सव धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी त्यांच्या सन १७७४ ते १७९४ या कालावधीत येथील गादीवर असताना येथे श्रीराम मंदिराची उभारणी केल्यापासून गेली सुमारे २२५ वर्षाहून अधिककाळ श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव प्रतीवर्षी परंपरागत पध्दतीने साजरा केला जातो.

श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनीच मुधोजी मनमोहन राजवाड्या शेजारी भव्य देखण्या श्रीराम मंदिराची उभारणी केली आहे.
रामनवमी उत्सवानिमित्त मानकरी वेलणकर कुटुंबातील अनिल वेलणकर व मान्यवरांनी मुधोजी मनमोहन राजवाड्यातून राजघराण्याच्या देवघरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती आणून ती मंदिरातील प्रभू श्रीराम, सीतामातेला भेटविल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,
जिल्हा परिषदेच्या सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सत्यजितसिंहराजे नाईक-निंबाळकर, मिथिलाराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केली त्यांनी सदर मूर्ती सजविलेल्या पाळण्यात ठेवल्यानंतर रामजन्माचा पाळणा उपस्थितांनी म्हटला. देवस्थान ट्रस्टचे कारभारी दशरथ यादव यांनी स्वागत केले. फलटणकर नागरिक, भाविक उपस्थित होते 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here