फलटण :
रविवार दि. 30 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत14 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटांचे 14 उमेदवार आणि विरोधकांचे 10 उमेदवारअसे एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 18 संचालक असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत.
तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला विक्रमी 121 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आणि इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. विरोधी राष्ट्रीय समाज पक्ष, बाळासाहेब यांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप यांचे 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मतदार यांच्यापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष पोहोचणार असल्याने आगामी काळात फलटण तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे