फलटण : २२ एप्रिल रोजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली १२ बलुतेदार आणि १८ पगड जाती एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात पार पडली.
यावेळी १२ बलुतेदार यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या महा पुरुषांचे देखावे, उंट, घोडे, हलगी पथक, २ झांज पथक, हनुमान यांचा वेश परिधान केलेला माणूस, प्रसिद्ध डॉल्बी सिस्टीम आणि प्रचंड मोठा जनसमुदाय फलटण वासियांना पाहण्यास मिळाले. या उत्सवासाठी सर्व समाजाच्या लोकांनी गेले १५ दिवस परिश्रम घेतले होते. शोभा यात्रेची सुरवात गजानन चौक येथुन लहान मुलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
शुक्रवार पेठ येथे मुस्लिम समाज्याच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती, तसेच मलठण येथे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर दर्गाह मस्जिद ट्रस्ट आणि बबलू भैय्या पवार, विशाल राहिगुडे, विजय गिरी यांनीही पिण्याच्या पाण्याची सोय हरिबुवा मंदिर जवळ केली होती.
या शोभा यात्रेत फलटण तालुक्यातून विविध गावातील नागरिक आणि तरुण सहभागी झाले होते त्यांचा उत्साह आणि उत्स्फूर्त सहभाग पाहून खासदार रणितसिंह नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही ते आपल्या सहकऱ्यासह यात शोभा यात्रेत नाचताना पहावयास मिळाले.
या शोभा यात्रेचे नियोजन पाहून पुन्हा याहीपेक्षा मोठी मिरवणूक पुढच्या वर्षी निघावी अशी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या.
या शोभा यात्रेत म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजतसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर, युवक काँग्रेस फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके,मा.नगर सेवक सचिन सूर्यवंशी बेडके, अशोक जाधव, जकिरभाई मणेर,फिरोज आतार, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, राष्ट्रीय काँग्रेस अपलसंख्यांक सेलचे अमीरभाई शेख तसेच पै. मेहबूबभाई मेटकरी, बबलू मोमीन, बाळासाहेब कदम यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि जनता तसेच तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती.