सातारा/अनिल वीर : जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जग उद्धारी…. या न्यायाने शंभरी पार केलेल्या आईने भीमराव दाभाडे यांना सर्वांगसुंदर घडविले आहे. समानतेचे बीज पेरल्यामुळेचे यापुढे त्यांची घोडदौड पाटण तालुक्यात राहणार आहे.त्यांनी संयुक्त कुटूंबासह सामाजिक सलोखा राखतील. त्यामुळे बहुजनांचे संघटन करून यशस्वी अशी सामाजिक क्रांती घडवतील. असे गौरवोद्गार पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे ज्येष्ट संचालक बंधुत्व समाजरत्न पुरस्कार विजेते भानुदास सावंत यांनी काढले.
म्हावशी,ता.पाटण येथील बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष यांची सेवानिवृत्ती व त्यांच्या मातोश्री तुळसाबाई दाभाडे (जीजी) यांचा संयुक्त समारंभ ऐरोली येथे मोठ्या उत्साहात पार पाडला.तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय अध्यक्ष भानुदास मार्गदर्शन करीत होते.
यावेळी डॉ.नंदकुमार कांबळे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रा.रवींद्र सोनवणे,पाटण तालुकाध्यक्ष प्राणलाल माने, जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे आबासाहेब भोळे,मुंबई कमिटीचे अध्यक्ष भगवान भोळे,राजाराम भंडारे,शुगलपाल देवकांत, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन कांबळे, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप,प्रकाश काशीळकर (कांबळे) आदी मान्यवरांनी सत्कारमूर्तींचा आपआपल्या भाषणात गौरव केला.सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट बौद्धाचार्य उत्तम पवार,सुनील माने,किशोर धरपडे,राहुल रोकडे,आबासाहेब भंडारे,दादा भंडारे,बाजीराव न्यायनीत, ग्रा.सदस्य तौफिक, पीएसआय माने,राजेंद्र सावंत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व कुटुंबीय,दाभाडे मित्र परिवार व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.