सातारा : कोरेगाव येथील तक्षशिला सामाजिक संस्थेतर्फे शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी छ. प्रतापसिंह हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला होता.त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे भाऊ मोहोड,माजी मुख्याध्यापक बापूसाहेब लोंढे व पो.निरीक्षक सुनील कांबळे याशिवाय, रिपब्लिकन सेनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदी मान्यवर उपस्थित होते.