सातारा : जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब शिरसाट यांना इंदोली,ता.कराड येथे पुण्यानुमोदनपर मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
यावेळी ज्येष्ट विद्रोही साहित्यिक पार्थ पोळके, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदा लादे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(गवई)चे जिल्हाध्यक्ष संजय गाडे,भारतीय बौद्ध महासभेचे सातारा तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,सौ.पंचशीला खंडाईत आदी मान्यवरांनी आपसपल्या मनोगतातुन बाळासाहेब शिरसाट यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ट बौद्धाचार्य तानाजी बनसोडे यांनी संपूर्ण विधिसह आदरांजलीपर मार्गदर्शन केले.बाबासो.कांबळे यांनी सहाय्य केले.प्रथमतः महापुरुष व बाळासाहेब शिरसाट यांच्या प्रतिमेस शिरसाट कुटुंबीय व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. सदरच्या कार्यक्रमास रमेश इंजे, आनंदा वाघमारे,बाळासाहेब सावंत, माधवी वरपे,दादासाहेब कांबळे,सुशीलकुमार कांबळे, प्रकाश खटावकर,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.