सातारा : महात्मा बुद्ध,अशोक सम्राट व डॉ.बाबासाहेब आंबेडकर Buddha, Ashoka Samrat and Babasaheb यांनी अनुक्रमे धम्मदीक्षा दिली होती.धम्म परिवर्तनास गती मिळाल्याने खऱ्या अर्थाने धम्मचक्रप्रवर्तन झाले आहे.अशा आशयाची मनोगत मान्यवरांनी व्यक्त केली.
आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौणिमेपर्यंत वर्षावास सुरू होते.त्याची सांगता जिल्ह्यांत ठिकठिकाणी झाली आहे.जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कोंडवे येथील नालंदा बुद्ध विहारात जिल्हा संस्कार विभागीय उपाध्यक्ष भागवत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावास समाप्ती व धम्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी,भ.गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अनुक्रमे अनिल वीर व ऍड.विलास वहागावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या मूर्तींना नंदकुमार काळे व दिलीप फणसे यांनी पुष्पांजली अर्पण केली. प्रकाश तासगावकर, विकास तोडकर, भागवत भोसले आदींनी मेणबत्ती प्रज्वलीत केल्या.शिवाय, कनिष्क सुर्वे,विकास जावळे आदींनी अगरबत्ती प्रज्वलीत केल्या होत्या. ३ महिन्यात आठवड्यातून एखदा असे १७ वे वर्षावासाचे पुष्प कोंडवे येथे घेण्यात आले.
धम्मबांधव उत्सव कमिटीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर यांनी दिनाचे महत्व अभ्यासपूर्ण विशद केले.केंद्रीय शिक्षक भागवत भोसले,समता सैनिक दल विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप फणसे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, विद्या गायकवाड, फुलाबाई गायकवाड आदींनीही मनोगत व्यक्त केली. शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी आपल्या पहाडी आवाजात प्रारंभ व शेवट करून वातावरण निर्मिती केली होती.बौद्धाचार्य कुमार सुर्वे यांनीही गीत गायिले.तालुका सचिव ऍड. विजयानंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.ज्येष्ट मार्गदर्शक बौद्धाचार्य हणमंत गायकवाड यांनी स्वागत व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास मनोज वाघमारे,बालक-बालिका,विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते, उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.याकामी, शोभा गायकवाड,रंजना गायकवाड,विद्या गायकवाड, रुपाली मोतलींग,दीपिका गायकवाड, निकिता गायकवाड, रेखा गायकवाड, वर्षा गायकवाड, फुलाबाई गायकवाड, गणपतराव गायकवाड, जयश्री गायकवाड, सखाराम मोतलींग आदींनी अथक असे परिश्रम घेतले.