बुद्धाचे विचार देश-विदेशात डॉ.आंबेडकर यांनी पोहचविले : सुमरत्न थेरो

0

सातारा : +. असे प्रतिपादन श्रीलंकेचे भन्ते सुमरत्न थेरो यांनी केले. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक सभागृहात भ.बुद्ध व त्यांचे शिष्य सारीतपुत मोगलयन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीधातु असलेला कलश रथ दर्शनसोहळा झाल्यानंतर समारोपप्रसंगी धम्मदेसना श्रीलंकेचे  व्ही.डब्ल्यू. सुमरत्न (थेरो) यांनी दिली. यावेळी भन्ते प्रज्ञापाल (थेरो), जिल्ह्यातील एकमेव भन्ते दिंपकर (थेरो) आदी देश-विदेशातील भन्ते उपस्थीत होते.

               

सुमरत्न थेरो म्हणाले, “भ.बुद्धांनी अनेक संकटावर मात करीत करीत अलौकिक धम्माचे कार्य केले होते.अशोक सम्राटांनी स्तंभ- पिलर,स्तुपवैगरे सर्वत्र निर्मिती करून धम्म प्रचारास बळकटी दिली होती.मात्र,काही द्वेष्टे समाजकंटकांनी पिलर व स्तुपची मोडतोड केली होती. तरीसुद्धा त्यांनी देशविदेशात विश्वशांतीचे कार्य केलेले आहे. संविधानाच्या माध्यमातून देशात बाबासाहेबांनी बुद्धाची तत्वप्रणाली दिली.” राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचीवर धम्म पोहचविण्याचे महान कार्य बाबासाहेब यांच्यामुळेच झाल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

               कृती समितीचे अध्यक्ष दिलीप जगताप,प्रा.दादासाहेब गायकवाड,अनिल वीर,ऍड. विजयानंद कांबळे, विकास तोडकर,दिलीप सावंत आदींनी स्वागत केले.

   सातारा येथे पुण्याहून आलेल्या यात्रेचे स्वागत,मिरवणूक, धम्मदेसना व मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी भीमाई स्मृती स्थळास भेट देऊन प्रतापसिंह नगर येथे दादासाहेब ओव्हाळ यांच्या निवासस्थानी भोजनदान झाल्यानंतर कोल्हापूर दिशेला मार्गस्थ झाले.दरम्यान,अतित, नागठाणे,उंब्रज,शिवडे,कराड आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले.२२ जिल्ह्यातून अंतिमतः नागपूर येथे समारोप होणार असून पुढील महिन्यात मध्यप्रदेशात जाणार आहे. 

         

 सदरच्या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवर,संघटनांचे प्रतिनिधी, उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या. प्रामुख्याने कैलास मोरे व त्यांचे सहकारी, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड.कांबळे-तोडकर आणि त्यांचा परिवार,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जिल्हाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, राजेश वसंतराव ओहाळ,सोमनाथ धोत्रे,दीपक गाडे,राकेश जाधव, रामभाऊ मदाळे,बापू कांबळे, नितीन बोतालजी,बाबा घोडेस्वार,किरण ओव्हाळ,स्मिता जगताप,मनीषा खरात,पूजा साळुंखे,वनिता खवळे, संजना पोतदार,वंदना सांगरे,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे,विशाल भोसले, नितीन रोकडे,संदीप जाधव,रमेश गायकवाड, रिपब्लिकन गवई गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,द्राक्षा खांडेकर, जी.प्रियांका मॅडम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर यांच्यासह उपाध्यक्ष माणिक आढाव, ऍड.विलास वहागावकर,पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते,वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे,बहुजन समाज पार्टीचे सतीश गाडे, त्रिरत्न महासंघाचे धम्मचारी संघादित्य,निवृत्ती मगरे,विजय भंडारे,मिलिंद कांबळे,उपासिका कांबळे व गडांकुश,डेमोक्रॅटिक पार्टीचे अमर गायकवाड, धम्मबांधव कमिटी, राष्ट्रोत्सव समिती आदी धार्मिक, सामाजिक,राजकीय आदी संघटनेचे प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here