सातारा : फुले- आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, डॉ.बाबासाहेब जयंती उत्सव कमिटी व माता रमाई महिला बचत गट आगाशिवनगर, ता.कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून रविवार दि. २१ रोजी सकाळी १० वा.तथागत भगवान गौतम बुध्द व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना आझाद कॉलनी, पाणीपुरठा आॕफीस शेजारी आगाशिवनगर येथील बुध्द विहारात भन्ते विमलरत्न महास्थवीर (मुंबई) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान,मूर्तींची मिरवणूक काढण्यात येणार आहे.मुर्ति दानकर्ते बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते मधुकर जगधनी-अण्णा (तारळे) यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांनी त्यांच्या विभागात अनेक विहारात मूर्ती दान केलेल्या आहेत.त्यांनी डॉ.आंबेडकर यांची तर विकास भंडारे (फौजी) यांनी बुद्धाची मूर्ती दान केली आहे.याशिवाय, दिपक एकांबे यांनीही साह्य केले आहे. सदरच्या कार्यक्रमास महाविहार बांधकाम कमिटीचे अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे,राहुडे शिक्षण समितीचे अध्यक्ष राहुल रोकडे, भारतीय बौध्द महासभा कराड तालुकाध्यक्ष बी.जे.माने, संस्कार सचिव राजाराम तथा आर. बी.पाटणकर,बौद्धाचार्य विजय भंडारे,अंनिसचे किशोर धरपडे, मुख्याध्यापक सुनिल माने, राजेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.तेव्हा उपासक-उपासिकांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.