भाजप विरोधार्थ मत विभाजन टाळावे.अन्यथा, मागचे तेच पुढे…

0

सातारा  : चला बहुजनांनो उठा ! निवडणूक जवळ आली आहे. नवीन प्रयोगाच्या नावाखाली (चाळीस वर्षे झाली नुसते प्रयोग सुरुच आहेत.)आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी मत विभाजनाची तयारी सुरू केली आहे.तेव्हा ती टाळून सत्ताधारी भाजपाला पुन्हा सत्ता देवू नये.अशी मागणी होत आहे.

     मुस्लिमांनी मुस्लिमांची मते खा ! आंबेडकरी चळवळीतील पक्षांनी मागासवर्गीय ,बौद्ध लोकांची मते खाऊया, ओबीसी नेत्यांनी ओबीसी मते खाऊ. त्यासाठी प्रत्येक समाजाच्या लोकांना निवडणुकीत मते खाण्यासाठी उभे करून पुन्हा एकदा ज्यांना आपण जातीवादी व संविधान बदलणार असे बोलतो. अशाच भाजपला आंबेडकरी व पुरोगामी विचारांच्या मतांचे विभाजन करून निवडून देण्यासाठी जोरदार तयारी करूयात.पुन्हा कामाला लागूयात,रक्ताचा वारसाचा वारस हक्क सिद्ध करण्यासाठी. लाखोंच्या सभा घेऊयात.(एका सभेचा खर्च कमीत कमी एक कोटी अशा 48 सभा म्हणजे जवळ जवळ 50 कोटी रुपये व इतर खर्च धरला तर अंदाजे 200 कोटी होईल.) एवढे पैसे येतात तरी कुठून? वेगवेगळ्या समाजातील लोकांना खोटे सत्तेचे गाजर दाखवून (आपली मते कमी आहेत हे माहित असतानाही) निव्वळ मत विभाजन करण्यासाठी निवडणुकीत उभे करून नेमके काय साध्य करायचे आहे ?  का आतून भाजपला सहकार्य करायचे आहे ? याचा विचार समाज केव्हा करणार ? बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या अनुयायांनी आतापर्यंत स्वतः कुटूंब बरबाद करून आंबेडकरी चळवळ करीत आली आहेत. जेव्हा खऱ्या अर्थाने अन्याय – अत्याचार होत होते. त्यावेळेस प्रसंगी जीवही गमवावा लागले आहेत काहींना. परंतु एवढं करूनही निव्वळ रक्ताचे वारस नसल्यामुळे  एवढं समाजासाठी करूनही किंमत शून्यच.

         समाजाची सभेसाठी एवढी वर्गणी  खऱ्या अर्थाने जमा होते का? त्याचा हिशोब कुणाकडे आहे ? गोरगरीब,शोषित, वंचित समाजातून वर्गणी जमा होत नसेल तर सभेचे स्पॉन्सर कोण आहेत? याचा विचार समाज केव्हा करणार आहेत? गेल्यावेळेस लोकसभेला जे उमेदवार उभे केले होते. ते आता कुठे आहेत? व त्यांचा आता आंबेडकरी चळवळीशी किती संबंध आहे? व ह्या सर्वांनी निवडणुकीनंतर आंबेडकरी वंचित सामाजाचे किती प्रश्न उचलले? (का नुसते मत खायाला उभे केले होते का ?) आंबेडकरी चळवळ म्हणजे नुसते निवडणूक आली उमेदवार उभे  करायचे व नंतर समाजाकडे सपशेल दुर्लक्ष करायचे.असे नसून आंबेडकरी चळवळ म्हणजे शोषित पीडित वंचिताचे सामाजिक संरक्षण कवच आहे. हे उमेदवारारांना माहित आहे का? ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निवडणुकीचे स्पॉन्सर समाजाला समजतील. त्यावेळेस सत्य बाहेर येईलच. कसल्याही परिस्थितीत भाजपला जर हरवायचे असेल तर बांधवांनो मत विभाजन करून 2019 प्रमाणे पुन्हा एखंदा भाजपला निवडून देऊ नका.एका बाजूने भाजपला जातीवादी बोलायचे व आतून सहकार्य करून त्यांचे उमेदवार पुन्हा कसे निवडून येतील.त्यासाठी जातीच्या नावाने मत विभाजन करायचे.असे आता चालणार नाही.बांधवांनो आपल्याला कळकळीची विनंती स्वत:चा भाऊ जरी मत विभाजणासाठी उभा राहिला तर त्याला मतदान करू नका. आपले मत भावाला देऊन भाजपचा उमेदवार निवडून येत असेल तर रक्तांच्या वारसाच्या नावाने सुरु केलेली लढाई आपण पुन्हा हरलोच समजा.? अशा प्रकारची पोस्ट एकनाथ रोकडे (9665596896) यांनी व्हायरल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here