भा.बौ.महासभेचे प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न

0

सातारा/अनिल वीर : भारतीय बौध्द महासभा,केंद्र महाराष्ट्र राज्य शाखेच्या आदेशानुसार जिल्हा पश्चिमेचे  जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा – वाई व पाचंगणी या शाखेच्या नुतन कार्यकारणी निवडीनतंर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वाई (आबेडकर नगर ) येथे  एक दिवसीय कार्यरता प्रशिक्षण – चितंन  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

       

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदा काबळे (जाभंळी) होते.यावेळी अशोक भालेराव, केद्रिय शिक्षक भिमराव गायकवाड (गुरूजी), सुनिल सपकाळ गुरूजी यांनी नुतन पदाधिकारी व बौध्दाचार्य यांना पुढील विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

   भारतीय बोध्द महासभा संस्थेचे ध्येय उध्दिष्ट व संपूर्ण देशातील कार्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. संस्थेचा कार्यकर्ता कसा असावा ? नुतन पदाधिकारी त्यांची कर्तव्य व जबाबदारी तसेच तालुका आदर्शवत  कारभार करण्यासाठी संस्थेचे रेकॉर्ड कसे ठेवावे ? या विषयावर केंद्रीय शिक्षक सुनिल सपकाळ गुरूजी यांनी मार्गदर्शन केले. शेवटी मनोगतात पाचंगणी शहराध्यक्ष रावजी काबंळे, सुशांत मोरे व  मारूती गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका सरचिटणीस विजयराव सातपुते  यांनी आभार मानले ल.एकुण ४० शिबिरार्थींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here