सातारा/अनिल वीर : हरपळवाडी, ता.कराड गावामध्ये compland इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून तिथे स्थानिक लोकांना कामाची संधी न देता बाहेरील लोकांना संधी दिली जाते. म्हणून कंपनीमध्ये भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी मंगेश गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाचे ३ दिवस झाले असूनही कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यांची तब्बेत हळू हळू खालावत चालली आहे. खूप प्रमाणात पाऊस चालू असताना आमचा उपोषणकर्ता घट्ट निर्धार करून बसला आहे.त्यांना चेकअप साठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर सुद्धा आलेले नाहीत.त्यांचं म्हणन असे आहे कि, प्रशासनाने दखल जरी नाही घेतली तरी आम्ही न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. कारण, कामगार आयुक्त सातारा येथे सहा महिन्यापूर्वी निवेदन देऊन त्यांना वारंवार भेटुन सुध्दा कोणतीही अद्याप दखल न घेतल्याने मंगेश गायकवाड यांनी आमरण उपोषणास बसले आहेत. गायकवाडच्या प्रकृतीस काय झालं ? तर आम्ही उद्रेक केल्याशिवाय शांत बसणार नाही.असा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.