महाबळेश्वर पालिका हद्दीत वेण्णा नदी पात्रालगत भर पावसात होत आहे पर्यवरणाची हानी…

0

महाबळेश्वर: महाबळेश्वर  नगरपालिका  हद्दीतील पाचगणी  कडे जाताना  रस्त्यापासुन काही आंतरावर वेण्णा नदी पात्रा  लगत  सर्वे  न. ७०  च्या  एकून असलेल्या  क्षेत्रा पैकी  काही  क्षेत्रावर काही  वर्षापूर्व  जमीन  बिगरशेती  करून  घेवून  डॉ. सानप  यांचे  हॉटेल  सुमनराज  नावाने  प्रशस्त भलेमोठे  व्यावसायीक  बांधकाम  करण्यात आले  असुन  याच  मिळकत  हद्दीत   काही  उच्चभृ  धनिक  लोकांचे  ढोले पाटील, गङाख, वाघमोङे,  सातव, अभवानी,  सुखानी,मोरे,इराणी,  या  व  इतर अशा  काही  धनिकांची  आलिशान बंगल्यांची  बांधकामे  मिळकतीत आहेत.

 

याच मिळकत  हददीतील  वाघमोङे  यांच्या बंगल्याच्या शेजारी  वृक्षराईने  व्यापलेल्या जागेमधून जेसीबी  यांत्रिक मशिनच्या साह्याने वृक्षराई उखङुन  खोदकाम  करुन रस्त्याचे काम सुरु असल्याचे दिसुन येत  आहे. सदर खोदकाम  ऐन  भरपावसात पर्यावरणाची हानी करून  जेसीबी यंत्राने  खोदकाम  करून रस्ता  तयार करण्यात येत असताना  महाबळेश्वर  नगरपालिकेच्या  वृक्षविभागाचे  अधिकारी , कर्मचार्यांचे  दुर्लक्ष होत असल्याचे  दिसून  येत  आहे.  याच सर्वे.नं.70/3अ मिळकत परीसरात काही वर्षा पुर्वी वृक्षतोड  करून  पर्यावरणाची  हानी करुन विकास कामासाठी जमीन  मोकळी केली  जात असताना  पर्यावरण प्रेमी  सुर्यकांत  पांचाळ  यांनी गैरप्रकार  उघडकीस आनला होता त्या वळेस  सर्व्हे  नं ७० / 3  च्या धनीक  मिळकत धारकांवर  महाबळेश्वर नगरपालिकेने फौजदारी  न्यायालयात फौजदारी  खटला दाखल  केला होता. आता  पून्हा  त्याच स नं.  ७०  परीसरात जमीन उत्खनन सपाटी करनाची  परवानगी  घेवून  वृक्षराई असालेत्या जागेतून जेसीबी ने वृक्षराई  उखडून रस्ता तयार करण्यात येत असल्याचे  संदर्भात समजून  आल्याने  पर्यावरण प्रेमी  सुर्यकांत पांचाळ  यांनी  समक्ष  पहाणी  करुन पर्यावरणाचे  हानीची घटना  स्थानिक तलाठी श्री शेङोलकर तसेच मंडल आधिकारी  व नगरपालिकेचे वृक्षअधिकारी यांना मोबाईल वरुन घटना स्थळाचे फोटो व लेखी मेसेज व्दारे कळवले.

 

   दुरध्वनी वरुन माहिती देउन  तलाठी शेङोलकर यांनी या मिळकती मध्ये  जमिन  सपाटीकरण करण्याची परवानगी दिली असल्याचे अजब प्रकार समोर आला वास्तविक पाहता संपुर्ण महाबळेश्वर  तालुका भारत केंद्र सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अतिसंवेदनशिल घोषित केला असताना दाट वृक्षराईने व्यापलेल्या जागेत सपाटीकरण  करण्याची परवानगी  कशी काय दिली जाऊ शकते ? तसेच  खुदाईची परवागी  घेवून  परवानगी  घेतलेल्या  व्यक्तीकडून  भलताच  हेतू , कार्यभाग  तर  साधला जातोय की  काय?  याची  शक्यता नाकारता  येवू शकत  नाही.

     केंद्रशासनाचे महाबळेश्वर तालुका पर्यावरण  संवेद  क्षेत्रात  पर्यावरनास  अशा  घटना  घातक  ठरू शकतात . वास्तवीक पहाता ज्या सर्व्हे क्र. ७० मधील ज्या पोट हिश्शातील मिळकतीत  वृक्षराई  असलेल्या  प्लॉट मधे  जेसीबी  लाउन जमीन उत्खनन  करून  रस्त्यासारखे कामसुरु  केले आहे त्याच परिसरात  काहि  महिन्यांपूर्वी  जेसीबी  ने  विनापरवाना उत्खनन केले प्रकरणी  तलाठी  शेडोलकर यांनी कारवाई  करून  जेसीबी  ट्रक्टर  वाहने जप्त  करून कारवाई  केल्याचे  वृत्त  प्रस्तीद्ध झाले होते.  आता याच मिळकत परीसरात  जमीन सपाटी करनाची  परवानगी  घेवून ऐन जुलै महिन्यात  भरपुर पावसाळी  व  दाट धुक्याच्या  वातावरनात  खुदाई  सपाटीकरनाची  परवानगी  घेवून पर्यावरना ची हानी  करून जमीन मोकळी  करून रस्ता बनविण्याचा   हेतु साधला तर  जात  नाही ना? अशी शंका  व  प्रश्न  उपस्थीत  होत आहेत.  या  विषयाची गांभिर्याने  दखल  घेवून  महाबळेश्वर नगरपालीका हददीतील मौजे क्षेत्र महाबळेश्वर स नं  ७०च्या पोटहिश्यामधील  मधील ज्या प्लॉट मधे जमीन सपाटी करनाची परवानगी  घेतल्याचे  सांगून  वृक्षराई ने व्यापलेल्या  मिळकतीत  जेसीबी  यांत्रीक मशीनने  पर्यावरणाचे नुकसान  करून  रस्ता  बनवत असल्या  सारखे  कामाची  दरवल घेउन  सुरु  केलेले  काम सखोल  चौकशी वस्तुस्थिती पडताळनी कार्यवाही साठी स्थगीत  करून चौकशी  तपास  करून  दोषी  आढळनार्या  व्यक्तींवर कारवाईची मागणी पर्यावरण  प्रेमी  सुर्यकांत  तथा  बाळासाहेब  पांचाळ  यांनी  केली  आहे.

       

             *महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील वेण्णा नदी पात्रा लगत असलेली सर्वे.क्र.70/3अ  या मिळकत हद्दीत धनिकांचे बंगले व विकास कामे साधण्यासाठी वृक्षतोङ करुन पर्यावरणाची हानी केली जात आहे.तसेच या मिळकत परिसरात एकुण केलेल्या सर्व बंगल्यांच्या बांधकामांची व हाॅटेलच्या बांधकामांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश देउन बेकायदेशिर बांधकामे पाङण्याची कारवाई करावी अशी मागणी श्री सुर्यकांत पांचाळ यांनी  केली आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here