सातारा /अनिल वीर : महिला के सन्मान में, रिपाई मैदान में…! नीता कांबळे व हिना मेश्राम या तरुणीस न्याय मिळालाच पाहिजे….अशा घोषणांनी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
मुंबई येथील सावित्रीबाई फुले वसतीगृह येथे कॅम्पुटर इंजिनीयरचे शिक्षण घेणारी हिना मेश्रामवरती अत्याचार करून निर्घुणपणे खून करण्यात आला होता. त्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाओ आंदोलन छेडले. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याबद्दल जिल्हा नांदेड येथील बोंडर गाव येथील अक्षय भालेराव यांचा खून करण्यात आला. यांच्या मारेकऱ्यांना फाशी मिळण्यासाठीही जिल्हाधिकारी कार्यालय येथे संयुक्त थाळी नाद आंदोलन करण्यात आले.यावेळी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) महिला आघाडी,युवक आघाडी,कामगार आघाडी, मराठा आघाडी, वाहतूक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी व थाळी नाद आंदोलन जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे,वाहतूक आघाडीचे नानासाहेब ओव्हाळ,योगेश माने,राकेश जाधव,किरण ओव्हाळ,दीपक भोसले,दीपक जाधव,पवन धायगुडे,सविता सकपाळ, जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेते मंडळी व पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.