माजगांव,ढोरोशी आदी ठिकाणी वर्षावास कार्यक्रम संपन्न

0

सातारा/अनिल वीर : वर्षावास कार्यक्रम सर्वत्र उत्साहात सुरू आहेत.माजगांव,ढोरीशी,ठोमसे आदी गावात भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने उपासक व उपासिका यांच्या उपस्थीत संपन्न झाले आहेत.

              माजगांव येथे वर्षावास कार्यक्रमाचे ८ वे पुष्प गुंफण्यात आले. सातारा तालुका संस्कार उपाध्यक्ष कुमार सुर्वे यांनी, ” डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता” या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.अश्विनी चंद्रकांत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.सुर्वे यांच्यासह आवडाबाई गवळी या आजींनी छान भीम गीत गायले.गवळी यांनी आभार मानून सरणतयं घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

             

बुद्धविहार ढोरोशी येथे, “सम्राट अशोक व बौद्ध मौर्य राजे” या विषयावर आप्पासाहेब भंडारे  यांनी उत्कृष्ठरीत्या धमप्रवचन केले.विधी संचालन बैध्दाचार्य आनंदा भंडारे व विजय भंडारे यांनी केले.राजाराम भंडारे यांनी प्रास्ताविक केले. किशोर धरपडे व सुनिल माने यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी भानुदास सावंत,राहुल रोकडे, मधुकर जगधनी, गौतम माने, बाजीराव न्यायनीत,विजय माने, रामचंद्र गायकवाड, उत्तम पवार, सुभाष पवार,बाबासो कांबळे, राजेद्र सावंत,भिमराव सप्रे, धनाजी कांबळे, सरपंच अर्जुन कांबळे,जगन्नाथ माने,जगन्नथ सावंत,संजय भंडारे,युवराज भंडारे,महेद्र भंडारे,साहिल जगदाळे,विजय भंडारे,नितिन लादे,योगेश भंडारे, काशिनाथ भंडारे,शंकर भंडारे,तानाजी भंडारे आदी ग्रामस्थ,उपासक, उपासिका बहुसंखेने उपस्थित होत्या.याकामी,सिद्धार्थ मित्र मंडळ यांनी अथक असे परिश्रम घेतले.

           

अशोक नगर येथील बौद्ध विहारांमध्ये वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त बौद्धाचार्य विजयराव गायकवाड यांनी, “२२ प्रतिज्ञा व त्यांचे पालन” या विषयावर धम्म उपदेश दिला. सुमित शीलवंत व फौजी सुनिल शिलवंत यांनी स्वागत केले. यावेळी विकास शीलवंत,संतोष शीलवंत, बाळू शीलवंत आणि रमाई महिला मंडळ व बालक – बालिका उपस्थित होत्या सर्वांचे आभार दयानंद शीलवंत माजी सरपंच दयानंद शिलवंत यांनी आभारप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here