माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.७ रोजी कार्यक्रमांचे आयोजन

0

अनिल वीर सातारा :  माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी शुक्रवार दि.७ रोजी साजरी केली जाणार आहे. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी १०।। वा.विविध संघटनांच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे.भारतीय बौद्ध महासभेतर्फे १० दिवशीय उपासिका शिबीर पाटण तालुक्यातील १२ गावात सुरू आहे.त्याचा सांगता समारोह  बोधिसत्व बुद्ध विहार येथे होणार आहे. सकाळी १० वा धम्म ध्वजारोहन,११.१५ वा. वंदना-सुत्रपठन,११ वा. धम्मरॅली,दु.१ वा भोजनदान व २ वा. जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

        भारतीय बौद्ध महासभेतर्फे दु.१.वा. कराड येथील महाविहार  येथे आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा सर्व आजी, माजी पदाधिकारी,बंधू भगिनी, हितचिंतक,महिला पदाधिकारी व इतर महीला भगिनी यांनी वेळेवर हजर रहावे.असे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे. सायंकाळी ७ वा.गोडोली (सातारा)  येथील जेतवन प्रसारक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशाच प्रकारे सर्वत्र कार्यक्रम होणार असल्याचे वृत्त आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here