मायणी : इंदिरानगर येथे दहा दिवसातून पिण्याचे व खर्चाचे पाणी ग्रामपंचायत नळ कनेक्शन ला येत असून या पाण्याच्या मेन कनेक्शन लिकेज असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. मोकाट व पाळीव जनावरे साठलेल्या पाण्याच्या खड्ड्यांमध्ये बसत असून तेच दूषित पाणी पुन्हा पाईप मधून नागरिकांना पोहोचत आहे. व तेच पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून याच बेघर वस्तीमध्ये डेंगूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले होते. याच बेघर वस्ती जवळ मायणी मधून गोळा होणारा ओला सुका कचरा विल्हेवाट न लावता विस्कटला जातो. ग्रामपंचायत ने इंदिरानगर बेघर वस्ती मधील नागरिकांच्या आरोग्यशिक खेळू नये हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अन्यथा आम्ही नागरिक व कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावरती उतरू .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मायणी शहराध्यक्ष फिरोज मुलाणी