सातारा : त्रिपुडी,ता.पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पांडुरंग वीर यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,एक भाऊ,भावजय, पुतणे, भाऊजी,बहीण व भाचे-भाची असा मोठा परिवार आहे.त्यांचा मनमिळावू स्वभाव होता.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी आदरांजली अर्पण केली आहे.