राज्यात वाढत्या दलित-मुस्लिम अन्याय अत्याचाराच्या घटनेंचा निषेधार्थ मोर्चा संपन्न

0

सातारा/अनिल वीर : जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात वाढत्या मुस्लिम दलित अन्याय अत्याचाराच्या घटनेंचा निषेध मोर्चा काढून विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

      सध्या राज्यात मुस्लिम दलित समूहाला जाणीवपूर्वक जातीयवादी शक्ती कडून लक्ष्य केले जात आहे.जातींच्या आणि धर्माच्या नावाने राज्यात दंगली निर्माण करण्याचे षडयंत्र मनुवादी प्रवृत्ती करीत आहेत.बीड जिल्ह्यात परळी गावात मुस्लिम समाजातील जरीन खान याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाला.जळगाव अमळनेर येथील पोलिस कस्टडी रिमांड काळात मुस्लिम युवकाचा मृत्यू झाला. परळी व जळगाव पोलिस यांच्यावर खुन केले प्रकरणी 302 दाखल करावा. टिपू सुलतान , औरंगजेब यांचे फोटो स्टेटस ठेवले कारणाने मुस्लिम समाजातील तरुणांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर होणारे हल्ले थांबले पाहिजे. नांदेड बोंढार हवेली येथे भीम जयंती साजरी केली म्हणून  बौद्ध समाजातील अक्षय भालेराव खून करण्यात आला खून प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त झाली पाहिजे.खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे.नांदेड हदगाव वाळकी येथे मातंग समाजातील लोकांनी भीम जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून रात्रीच्या वेळेस लाईट बंद करून मातंग वस्तीवर हल्ला चढवला होता.  गायकवाड नामक तरुणाला गंभीर जखमी करून गावातील मागासवर्गीय समाजातील 15 लोकांवर दरोड्याचा गुन्हा टाकून जेलमध्ये टाकण्यात आले. लातूर रेणापूर येथील मातंग समाजातील तपघाले कुटुंबावर जातीवादी गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील मातंग समाजातील शशिकांत बोतालजी याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या संबंधित डॉकटर  यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच भारतातील हाफिज सय्यद मनोहर भिडे याच्यावर राष्ट्रध्वज , राष्ट्रगान, स्वातंत्र्य दिन यांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्त्यवाबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.अशा सर्व घटनांचा विचार केला असता राज्यात दलित मुस्लिम यांच्यावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहेत.या सगळ्या घटनांचा जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे वतीने निषेध करीत आहे.आम्ही महाराष्ट्र शासनास इशारा देतो की वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार झाला नाही. तर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भाने मुस्लिम व दलित समाजामध्ये जावून त्यांच्यामध्ये जनजागृती करून प्रचंड जनआंदोलन उभे करू. यामुळे जर कायदा आणि सुवेवस्था याचा प्रश्न निर्माण झाला तर यास महाराष्ट्रातील शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.छ.शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.तदनंतर पोवई नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.सदरच्या मोर्चास जिल्हाध्यक्ष, महासचिव, पदाधिकारी,सर्व विभागाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here