आजचा दिवस – शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, श्रावण अमावस्या सकाळी ७ वा. २६ मि. पर्यंत नंतर भाद्रपद शुक्ल प्रतिपदा, मंगळवार, दि. ३ सप्टेंबर २०२४, चंद्र – सिंह राशीत, नक्षत्र – पूर्वा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. २५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५० मि.
नमस्कार आज चंद्र सिंह राशीत राशीत रहाणार आहे. आजचा दिवस अमावस्या वर्ज्य दिवस आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु व कुंभ या राशीना अनुकूल तर कन्या, मकर व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : काहींना विविध लाभ होणार आहेत. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकणार आहात. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा दबदबा राहील.
मिथुन :प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कर्क : काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे.
सिंह : आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल.
कन्या : काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. विविध लाभ होतील.
वृश्चिक : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. स्वास्थ्य लाभणार आहे.
धनु : प्रवास सुखकर होणार आहेत .मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्द वाढणार आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.
मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्य जपावे. काहींवर एखादे भावनिक दडपण राहील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामात दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात.
मीन : आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. प्रतिकूलता जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.
आज मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४ गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४