रिपाई (ए) महिला कार्यकारणीच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0

 सातारा/अनिल वीर :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) च्या महिला आघाडीच्या कार्यकारिणीच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

          जिल्हाध्यक्षा पूजाताई बनसोडे आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या वंदना सरगर, स्वाती गायकवाड, स्मिता जगताप, संध्या आदी महिलांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितामध्ये राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, खटाव तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत शिवसरण,सातारा तालुका अध्यक्ष रामभाऊ मदळे, सातारा युवक उपाध्यक्ष शेखर आढागळे, जिल्हा संघटक सागर फाळके, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ओव्हाळ, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष राकेश जाधव, सम्राट गायकवाड,अतुल गरड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

          यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले,”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या जोरावर आज महाराष्ट्रासह देशांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळत आहे.केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे शक्य झालेले आहे.तेव्हा ऋण फेडायचेच असेल तर महिलांना खऱ्या अर्थाने सबलीकरण होण्यासाठी पुढे आले पाहिजे. तेव्हा महिलांनी रिपब्लिकन पक्षाचे योद्धा व रणरागिनी झाले पाहिजे.”  यावेळी अनेक महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here