खा.शरद पवार यांच्या हस्ते जकातवाडी येथे पुरस्कार वितरण
सातारा/अनिल वीर : भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था यांच्यावतीने जकातवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी खा.श्रीनिवास पाटील होते.
खा. शरद पवार म्हणाले, “डॉ.बाबासाहेबांनी मंत्रीपदाच्या काळात जलक्रांती दाखवून दिली. शिवाय,संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाही दिली. रयत शिक्षण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना चालू आहे. फुले-शाहु-आंबेडकर विचार धारेवर पुरस्कार देणे हा स्तुत्य असा उपक्रम आहे.विज्ञानावरच जगतात विविध क्षेत्रात बदल होत असतात.”
यावेळी खा.पाटील व पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केली. सामाजिक बांधिलकिच्या भूमिकेतून गेली कित्येक वर्षे संस्थेकडून हा पुरस्कार वितरण केले जाते.संपूर्ण जग हे विज्ञानावर यावर्षी फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार पद्मश्री खा. कुमार केतकर,जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध वक्त्या सुषमाताई अंधारे व यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्यिक पुरस्कार अरुण जावळे यांना सन्मानीत करण्यात आले.सुमारे ३० वर्षापूर्वी साताऱ्याच्या ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्याच्या उतारावर या संस्थेचा प्रवास सुरू झाला. ओसाड, ओबडधोबड, खडकाळ अशा जमिनीवर उपराकार लक्ष्मण माने यांनी पाय ठेवला आणि अफाट मेहनतीने त्याठिकाणी शैक्षणिक नंदनवन फुलवले. खरेतर त्यांच्या दूरदृष्टीतून फुललेले हे शैक्षणिक नंदनवन जगभर प्रसिध्द आहे. इथे प्रारंभीचे शिक्षण ते बी.एस. डब्ल्यू – एम. एस. डब्ल्यूपासून ते तत्सम विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते. ज्या मुलांना आईवडील नाहीत, ज्यांना घरदार नाही,ज्यांना गावशीव नाही, जे गरीब – वंचित – सर्वहारा आहेत. अशा भटक्या-फाटक्या मुलांसह देशविदेशातील गर्भश्रीमंताचीही मुले येथे शिक्षण घेत असतात. आज महाराष्ट्रातील दुसरे आनंदवन म्हणून या शैक्षणिक संकुलाकडे पाहिले जाते. समग्र समाज बदलाचं मूलभूत स्वरुपाचे तत्वज्ञान जगणारे- शिकवणारे हे आनंदवन दरवर्षी दि.९ मेला ओसंडून वहात असते. महाराष्ट्राच्या प्रागतिक विचार विश्वात प्रतिगामी शक्तींच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे, ज्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलिकडे पसरेलेले आहे असे ख्यातनाम साहित्यिक – पत्रकार – खासदार असणारे पद्मश्री कुमार केतकर, त्याचबरोबर तर्कशुद्ध युक्तिवादाने भल्याभल्यांना निरुत्तर करणाऱ्या आणि परिवर्तनाच्या चळळवळीला अधिक प्रवाही करणाऱ्या झुंजार वक्त्या – नेत्या सुषमा अंधारे व अरुण जावळे यांना सन्मानीत करण्यात आले.
अजिंक्यतारा किल्याच्या कुशीत विसावलेल्या संस्थेच्या यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय तथा शारदा आश्रमाच्या प्रांगणात हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी प्रास्ताविक केले.मिलींद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.भाई माने यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते उपस्थित होते.