सातारा : हे विश्वची घर…या न्यायाने मानवाने संकुचितपणा ठेवू नये.विश्वाचे नागरिक आपण आहोत.या भावनेने डोळसपणे पाहिले पाहिजे. भूतलावरील सर्वच सजीवसृष्टीना जगण्याचा अधिकार दिला पाहिजे.असे आवाहन ज्येष्ट साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेने जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न झाला.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य रमनलाल शहा होते.यावेळी संस्थेच्या सणालीक
श्रीपाल सबनीस म्हणाले, “जगाचा नकाशाच मानवाने बिघडवला आहे.त्यामुळे तापमान वाढत आहे.मानवास खऱ्या अर्थाने आनंदी व समाधानाने राहण्यासाठी निसर्गाचा आश्रय निर्माण केला पाहिजे. चिमणी मानदंड मोठा असून बालकांचे काळीज आहे.माणसाबरोबरच प्राणीमात्रावर प्रेम करायला शिकले पाहिजे.मानव विकासासाठी पर्यावरणाची हानी करतो.स्वतःसाठी मोठी घरेही बांधतो.तेव्हा मानवाच्या दुसऱ्या जिवाचाही विचार केला पाहिजे. चिमणीसाठी साधा खोपा करू देत नाहीत.सामाजिक जाणिवेने संस्थेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दिशादर्शनासाठी महान असे कार्य केलेले आहे.प्राचार्य रमनलाल शहा यांनी आंबेडकर विचारधारेवर पुस्तक लिहीत आहेत.त्यामुळे ते अभिनंदनास पात्र ठरतात.नैतिकतेशिवाय विकास नाही. अहिंसात्मक मार्गाने वाटचाल करणारा देश असल्याने माणसांप्रमाणेच प्राणीमात्रावर दयाभाव दाखवावा.
शिरीष चिटणीस प्रास्ताविकपर बोलताना म्हणाले,”जिल्ह्यातून सुमारे सव्वाशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.त्यापैकी १० विजेत्यांनी सुयश पटकावले आहे.चिमणी एक प्रतिमा आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच सजीवसृष्टीस जोपासले पाहिजे.” डॉ.शशिकांत म्हणाले, “पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी मानवनेच पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे म्हणाले, “मधमाशी फुलाला इजा न करता मध गोळा करते.तेव्हा मानवाने मधमाशीसारखे राहुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास साह्य केले पाहिजे.पर्यावरणाची साखळी महत्वाची असून जैविक विविधतेत चिमणी महत्वाची आहे.तेव्हा विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेण्यासाठी आतापासून कार्यरत राहिले पाहिजे.”
प्राचार्य रमनलाल शहा म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे.महापुरुषांच्या विचार व निसर्गाच्या सानिध्यात मानव खऱ्या अर्थाने प्रगती करू शकेल.” यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, स्पर्धक विजेते,पालक व अध्ययनार्थी उपस्थित होते.