सातारा/अनिल वीर : दि बुद्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,जावली तालुका व पंचशील नगर, कुडाळ यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. कालकथित संजय गणपत कांबळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त व जेष्ठ पौर्णिमा यांचे औचित्य साधून बोधी वृक्षारोपण कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी जावली अध्यक्ष संतोष खरात व सचिव अनिल शिंदे उपस्थित होते.
कालकथित संजय कांबळे यांचे चि.तुषार, मुलगी व पत्नी यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.दशरथ कांबळे म्हणाले,”जावली तालुका हा एक धम्म पॅटर्न बनवणार आहे.प्रत्येक बौद्ध नगरात झाडे देवुन संकल्प राबविण्यात येणार आहे.प्रत्येक घरात धम्म पोहचवणार आहोत.” यावेळी उत्तम देवकर, मनोज कांबळे, प्रविण कांबळे, संदीप कांबळे, निलेश कांबळे, शैलेश कांबळे, सुशांत कांबळे,करण कांबळे आदी मान्यवरासह उपासक-उपासिका उपस्थीत होत्या.