सातारा/अनिल वीर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शखाली शिवसेनेतर्फे राज्यभरात Shetkari Samvad Yatra ‘शेतकरी संवाद यात्रा’ सुरु आहे.अशी माहिती शेतकरी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विकास हादवे यांनी केले.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यापाठोपाठ ही संवाद यात्रा शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात,कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर येथे संवाद यात्रा संपन्न झाली.
शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन संवाद साधला. शिवाय,शेतीविषयीचे विविध प्रश्न जाणून घेतले.त्याचबरोबर शेतीविषयक असणाऱ्या अनेक मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन काही प्रश्नांचे तात्काळ निराकरणही करण्यात आले.शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची व आधुनिक पद्धतीने शेती करण्याची माहितीही शेतकरी बांधवांना दिली.शेतकरी संवाद यात्रेला शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री पाठीशी ठाम असल्याचा विश्वासही शेतकरी बांधवांनी व्यक्त केला आहे.अनेक वेळा सत्तेतून पायउतार झाल्यानंतरच शेतकऱ्यांची बाजू घेणारे अनेक पक्ष पाहिले.मात्र,महाराष्ट्रात पहिल्यांदाच असे घडले असेल की सत्तेत असणारा पक्ष थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना असणाऱ्या अडचणीची माहिती घेत आहे.असाही दावा जिल्हाध्यक्ष विकास हादवे (पाटण) यांनी दिला आहे.