संगोपन,संस्कार व शिक्षण या त्रिसुत्रीवरच सर्वांगीण विकास होतो : भगवान भोळे

0
फोटो :आदरांजली अर्पण करताना भिकाजी वीर शेजारी सिद्धार्थ शिंदे,वीर व श्रोतावर्ग.(छाया-अनिल वीर)

सातारा :  मातेने आपल्या मुलांना हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करुन सांभाळ करते.त्यांनी  संगोपन,संस्कार व शिक्षण या त्रिसुत्रीवर जीव ओतून लक्ष केंद्रित केले तर समाजाच्या सर्व स्तरांवर विकास करण्यासासाठी त्यांचे उत्तराधिकारी प्रयत्नशील असतात.असे विचार भारतीय बौद्ध महासभेचे पाटण व मुंबई कमिटीचे अध्यक्ष भगवान भोळे यांनी मांडले.

    त्रिपुडी,ता.पाटण येथील ज्येष्ट धम्मउपासिका स्मृतिशेष किसाबाई श्रीपती वीर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भांडुप येथे ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते भिकाजी (भाऊ) वीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी सिद्धार्थ शिंदे,  विलास वीर आदींची उपस्थिती होती.

    भिकाजी वीर म्हणाले,”मातेने अपार असे काबाड कष्ट करून घर,संसार व समाज यात समरस होऊन कार्य केले होते.त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.धम्म बुद्ध-भिम गीते जयंतीच्यावेळी म्हणत होत्या. तेव्हा आम्हीही त्यात समरस व्हायचो.त्यांनी मुलांना काहीही कमी पडू दिले नव्हते. म्हणूनच ते वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.”

    दरम्यान,भगवान श्रीपती भोळे यांनी ग्रामीण व मुंबई कमिटीच्यावतीने प्रसार माध्यमातून सोडलेली आदरांजलीपर भावूक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांनी वीर मातेच्या कर्तृत्वाचा भावूक असा पाढाच रेखाटन करून त्यांनी अनोखी अशी आदरांजली अर्पण केली आहे.ते पुढे म्हणतात, “वडिलांची प्रचंड शक्ती,धाडस, बुध्दीकौशल्याच्या पाठबळावर आणि आशिर्वादाने उच्चशिक्षण, नोकरी,सामाजीक,धार्मीक आणि राजकीय कार्याचे बाळकडू मुलांना प्राप्त झाले.मातेमुळेच सर्व क्षेत्रात मुले आदर्शवत असे कार्यरत आहेत.आपण आपले कार्य करत रहायचे. हाच स्वाभिमानी बाणा मातेने शिकविला होता. तो आज मुलांच्या प्रत्यक्ष कार्यातून दिसत आहे.ध्येय व संकल्पना पूर्ण केल्याशिवाय तुमची मुले स्वस्त बसणार नाहीत.शिवाय, समाजीक व राजकीय वारसा चालविल्याशिवाय आणि समाजप्रबोधन केल्याशिवाय -राहणार नाहीत.याची आपणास खात्री आहे.आई तुमच्या कष्टामुळे व त्यागामुळे आज आम्ही सुखी व आनंदी आहोत.” भोळे यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विविध माध्यमाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.

        याकामी,सुनील वीर,सुशीला अडसूळे,अनिल वीर,चंद्रकांत वीर,अशोक वीर यांच्यासह सुरज, आकाश,चैतन्य,सागर,संजना, संचिता,अनिरुद्ध,अनुला,चैताली,सौ.वैशाली,सौ.छाया व उर्वरित सर्व वीर कुटुंब,संबंधित सर्व नातेवाईक,संपूर्ण वीर भावकी व मित्र परिवार यांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here