. अजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका.
फलटण प्रतिनिधी श्रीकृष्ण सातव.
सध्याच्या शासनकर्त्यांना जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते दुर्लक्ष करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते, प्रवक्ते जनतेची दिशाभूल करण्यासाठी बेताल वक्तव्य करतात.सुसंस्कृत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कामही ते करीत आहे असे आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण येथील मुधोजी क्लबच्या मैदानावर मंगळवार दि. 9 मे रोजी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना.अजित पवार बोलत होते.हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडण्यात आला
तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांनी डोंबलकवडी आणि मीरा देवधर च्या संदर्भात केलेल्या कामाची इतिहास नोंद राहील असेही त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, सुनील भुसारा शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर घारगे, संजीव राजे नाईक निंबाळकर, शिंदे नितीन पाटील, बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, शिवरूप राजे खर्डेकर, सुभाषराव शिंदे,नाईक निंबाळकर कुटुंबीय,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होतेविधान परिषदेतील सभापतींमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची सर्व मान्यता निश्चितच अभिमानास्पद असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आगामी काळात सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार सोहळा करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी या कार्यक्रमादरम्यान सुचित केले.
रामराजे यांची कार्यपद्धती पाहता त्यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी लोकसभेसाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडण्यासाठी उपस्थित जनसमुदायाची त्यांनी होकार घेतला. त्याला अजित पवार यांनी पाठिंबा दिला. थोडक्यात आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून रामराजे निंबाळकर हे उमेदवार असतील असे यावेळी चित्र पहावयास मिळाले.जयंत पाटील यांनी सांगितले की रामराजे यांनी राज घराण्याचा थाट कधी दाखवला नाही. ते सातारा जिल्ह्याचे खरे भगीरथ आहेत. त्यांच्यामुळेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला धरणांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झालेले आहे.रामराजे यांच्या कर्तुत्वामुळे पदाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे
यावर बोलताना रामराजे यांनी सांगितले की मालोजीराजांच्या सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून आपण काम केल्यामुळे मला आज समाधान वाटत आहे. कृष्णा खोऱ्याच्या पाण्यावर लवाद बसला असतात सातारा जिल्ह्याचे पाणी गेले असते. ते पाणी जाऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले. त्याला शरद पवार, जयंत पाटील, अजित दादा पवार यांनी मदत केली. त्यामुळे साताऱ्याचे पाणी तर गेलेच नाही ,परंतु 81 टीएमसी पाणी अधिकचे मिळाले.पवार घराण्याने बारामतीकरांना विकासाचा विश्वास दिला आहे. तोही आपल्याला इथे निर्माण करावयाचा आहे.त्यामुळेजनतेने नको त्या लोकांना मतदान करू नये .समाजाने मी केलेल्या कामाची दखल घेत अयोग्य माणसांना त्यांची जागा दाखवून द्यावी. तसेच नाईक निंबाळकर घराण्यातील पुढील पिढीला पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. एक नाईक निंबाळकर निवडून आणत दुसऱ्या नाईक निंबाळकरला घालवल्या शिवाय आपल्याला स्वस्थता लावणार नाही असे त्यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींना उद्देशून सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रामराजे यांची जलतूला, ग्रंथ तुला आणि धन्यतुला करण्यात आली. तसेच अजित पवार .जयंत पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी मानपत्राचे वाचन केले.यावेळी आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त करताना रामराजेंच्या पार्श्वभूमीची आणि कार्यपद्धतीची आठवण करून देत रामराजांचे अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक आमदार दीपक चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासा सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते, फलटण येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची नयनरम्य अतिशय बाजी करण्यात आली. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.