फलटण प्रतिनिधी:–समस्त शिंपी समाजाची अग्रणी असलेली 116 वर्षाची राज्यस्तरीय संघटना नामदेव समाजोन्नती परिषदेच्या फलटण शहर अध्यक्ष पदी करण भांबुरे तर फलटण ग्रामीण च्या अध्यक्ष पदी समाधान कळसकर यांची नियुक्ती करण्यात आली, सातारा जिल्हा अध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांच्या हस्ते कार्यकारिणीस नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
फलटण येथील विठ्ठल मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात समारंभ पूर्वक नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष इंजि.सुनील पोरे,विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष विजय उंडाळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पद्मा टाळकुटे हे प्रमुख उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे हे होते.
यावेळी सुनील पोरे म्हणाले समाज हितासाठी प्रत्येक घरातून सहकार्य होण्याची आवश्यकता असून , सर्व समाज बांधवांनी खांद्याला खंदा लावून काम करून समाज हित जोपासले पाहिजे ,लवकरच राज्यस्तरीय मेळावा सातारला घेण्यात येणार आहे.समाजातील युवकांना एकतेचे बळा विषयी महती पटल्याचे चित्र सध्या सातारा जिल्ह्यात दिसत असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले नामदेव समाजोन्नती परिषदेच्या झेंड्याखाली संघटित राहून आपला विकास साधावा बांधवांशी संवाद साधताना धाग्याने कापड जोडण्याची खासियत असणाऱ्या समाजबांधवांनी सध्याच्या गतिमान युगातही एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी सर्वतोपरी मदत करावी व माणूस माणूस जोडावा. मतभेद विसरून “शिंपी सारा एक” हा मंत्र जपायला हवा. सर्वांना सोबत घेतले तर प्रगती आजिबात दूर नाही फक्त मरणदारी आणि तोरणदारी एकत्र न येता सामाजिक बांधिलकी मानून समाजात सहभागी व्हावे असे आवाहन सुनील पोरे यांनी केले
यावेळी फलटण शहर अध्यक्ष करण भांबुरे व फलटण ग्रामीण अध्यक्ष समाधान कळसकर यांनी ही फलटण तालुक्यातील शिंपी समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित आणून सामाजिक कार्य मोठ्या हिरहिरीने आम्ही पदाधिकारी करणार असल्याची ग्वाही दिली या वेळी सुभाष भांबुरे यांचेही समयोचित भाषण झाले.
याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना अध्यक्ष सुनील पोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यामध्ये फलटण शहर ना. स. प. कार्यकारिणी अध्यक्ष करण भांबुरे,उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, सचिव मनीष जामदार ,खजिनदार ज्ञानराज पोरे,सदस्यपदी शेखर हेंद्रे, महेश हेंद्रे,राजेश हेंद्रे,
सुनील पोरे,राहुल जामदार,ऍड राहुल टाळकुटे,मृणाल पोरे,
महेश उरणे,मधुकर मुळे,श्रीमती सुलभा मोहोटकर,श्रीमती रेखा हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली तर फलटण ग्रामीण ना. स.प. च्या अध्यक्ष पदी समाधान कळसकर-निंबळक,उपाध्यक्ष पदी संजयकुमार बाचल-गोखळी,सचिव पदी संजय किकले-तरडगाव,खजिनदार पदीअविनाश कुमठेकर-गोखळी
सदस्य पदी शीतल लंगडे-तिरकवाडी
राजेंद्र मोहोटकर- कांबळेश्वर
सुरज बेंद्रे-गिरवी
रोहित नामदास -कोळकी
पांडुरंग किकले-आदर्कि बु यांना समारंभपूर्वक जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन यथोचित स्वागत करण्यात आले यावेळी दिगंबर कुमठेकर, राजेंद्र गाटे,प्रकाश,अच्युत मुळे, प्रकाश टाळकुटे, कळसकर,दत्तात्रय पोरे,अभाजीत माळवदे,मृणाल पोरे,सौ अंजली कुमठेकर, सौ अश्विनी हेंद्रे,सौ स्मिता कळसकर,सौ रेणुका कळसकर,सौ प्रभा हेंद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होते सूत्र संचालन श्रीमती रेखा हेंद्रे यांनी केले तर शेवटी आभार श्रीमती सुलभा मोहोटकर यांनी मानले