सांगली : सांगली – मिरज रोडवरील रिलायन्स ज्वेलर्सवर गोळीबार करून भरदिवसा आज (दि.४) दुपारी दरोडा टाकण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. जिल्ह्यात सर्वत्रच नाकाबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील टोल नाक्यावर कवठेमहांकाळ पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी नकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. यावेळी नाकाबंदी तोडून एक टाटा सुमो गाडी (MH07AQ 5599) निघून गेली आहे.
शिरढोण टोल नाक्यावर सुरु असलेली पोलिसांची नाकाबंदी तोडून एक टाटा सुमो गाडी (MH07AQ 5599) निघून गेली आहे. पोलीस त्या गाडीचा शाेध घेत आहेत. पसार हाेताना या गाडीतील व्यक्ती पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्याचबरोबर गाडीतील व्यक्ती दारुच्या बाटल्यांचे बॉक्सही बाहेर फेकले, अशी माहिती मिळत आहे. शिवाय टाटा सुमो गाडीचा नंबर बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी सांगोला तालुक्यातील आडकनाळ येथील टोल नाक्यावरील बॅरीकेटींग तोडून पुढे गेली आहे. दरम्यान, सीसीटीव्हीतून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. सीसीटीव्हीत एक संशयास्पद व्यक्ती दिसून आली आहे.
सात जणांच्या टाेळीचा ज्वेलर्सवर दराेडा
सांगली -मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. या रस्त्यावरील एक झाड आज दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्याचा फायदा घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला.
दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घातले. दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटले आहेत. या वेळी एका ग्राहकाने दुकानातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्राहकाच्या दिशेने दरोडेखोरांनी गोळीबार केला. ताे थाोडक्यात बचावला. मात्र शाोरुमच्या तळमजल्यामध्ये पडून जखमी झाला आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले; परंतु दुकानाबाहेर श्वान घुटमळले. दरम्यान, दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथक रवाना झाली आहेत.