सातारा दि. 2 – जिल्ह्यात दि. 2 ऑगस्ट रोजी सरासरी 21.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 757.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 32.7 (732.4), जावली-मेढा – 47.4 (1340.4), पाटण – 33.6 (1172.3), कराड –18.2 (703.0), कोरेगाव –14.2 (548.3), खटाव – वडूज – 8.9 (415.3), माण – दहिवडी – 3.5 (306.5), फलटण – 0.7 (330.4), खंडाळा – 4.7 (298.5), वाई – 24.3 (667.3), महाबळेश्वर – 73.5 (2618.5) या प्रमाणे पाऊस झाला आहे.
*जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा
जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 127.97 अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प –
कोयना – 86.72 (82.39), धोम – 11.51 (85.26), धोम – बलकवडी – 3.44 (84.31), कण्हेर – 8.01 (79.31), उरमोडी – 8.12 (81.53), तारळी – 5.04 (86.15).
मध्यम प्रकल्प – येरळवाडी – 1.158 (100.00), नेर – 0.14 (33.65), राणंद – 0.16 (63.75), आंधळी – 0.16 (48.93), नागेवाडी- 0.18 (79.57), मोरणा – 0.95 (68.35), उत्तरमांड – 0.60 (68.52), महू – 0.89 (80.91), हातगेघर – 0.12 (47.31), वांग (मराठवाडी) – 2.06 (75.49) या प्रमाणे पाणीसाठा आहे.