सेंट जोसेफच्या स्वरा मालुसरेची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड

0

पाचगणी : तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत स्वरा सचिन मालुसरे हिने प्रथम क्रमांक मिळवला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या उज्ज्वल यशाबद्दल स्वराचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल येथे झालेल्या 14, 17 व 19 वर्षीय मुले व मुलींमध्ये झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल येथे आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या स्वराला क्रिडा शिक्षक स्वप्ना केळकर व आतंरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतलेले वडील सचिन मालुसरे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल स्कूलच्या प्रिन्सिपल सामीन फर्नांडिस, व्यवस्थापक कल्पना परेरा यांनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल स्वरा मालुसरे हीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here