स्मृतीप्रित्यर्थ धनादेश देऊन जयंती साजरी

0

सातारा/अनिल वीर : राज्यस्तरीय माळी महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष अण्णासो माळी आणि फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली.

              प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.अतुल बाबा भोसले , माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) , नगराध्यक्ष नीलम ताई येडगे, शेती मित्र अशोकराव थोरात भाऊ, ज्येष्ठ नेते नगरसेवक विनायक पावस्कर (अण्णा), उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे (भाऊ) व भानुदास माळी उपस्थित होते.जयंती उत्सवचे औचित्य साधून फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे विश्वस्त बाळासाहेब सातपुते यांच्यावतीने सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने इ.10 वी व 12 वी मधील उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना प्रत्येक वर्षी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याची घोषणा करत सदर उत्तीर्ण झालेल्या मुलांना प्रत्येकी रु. 5000/-  प्रमाणे डॉ.अतुल बाबा भोसले यांच्या शुभहस्ते चेक देण्यात आला.सदर जयंती उत्सव कार्यक्रमासाठी परिसरामधील लोक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये मलकापूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक राजू भाई मुल्ला, आर.आर,आबा, आबासाहेब सोळवंडे, आण्‍णासो काशीद, अजित काक थोरात, हणमंतराव जाधव (तात्या), अमर इंगवले, भाजपा शहराध्यक्ष सुरज शेवाळे, राहुल यादव, सागर बर्गे, मनसे नेते दादासो शिंगण,भाजप  युवा मोर्चा अध्यक्ष बापू जंत्रे, डॉ.सारिकाताई गावडे असे बरेच प्रमुख मान्यवर आणि   फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here