हिंदी अध्यापक मंडळाच्यातालुकास्तरीय विद्यार्थी स्पर्धांचा निकाल जाहीर

0

सातारा/अनिल वीर :  जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील पाचवी ते दहावी पर्यंतच्या तालुका स्तरावर ग्रामीण व शहरी विभागातील Student Competitions विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या सात प्रकारच्या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी दिली.

सदरच्या स्पर्धा ११ तालुक्यांसाठी १० केंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये ११ तालुक्यातील एकूण २७८५ विद्यार्थी सहभागी झालेले होते. अनुलेखन (इ?५ वी), सुलेखन (६ वी), निबंधलेखन (७ वी), वक्तृत्व (८ वी),सुलेखन-शुद्धलेखन(९ वी), सामान्यज्ञान (९ वी-१० वी), निबंधलेखन (१० वी) या स्पर्धांमधून ग्रामीण व शहरी विभागातील तालुकावार प्रथम तीन/पाच क्रमांकाने यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

          सातारा- १०६, पाटण-४२, कराड-११६, कोरेगाव-४४, खटाव-७७, माण-३३, फलटण-२२, खंडाळा-७४, वाई-महाबळेश्वर-६८ व जावली-३२ अशाप्रकारे ग्रामीण विभागाचे ३६२ व शहरी विभागाचे २५२ एकूण ६१४ विद्यार्थी जिल्हा स्तरासाठी पात्र घोषित करण्यात आल्या असून जिल्हा स्तरावरील स्पर्धा दि.२१ रोजी नियोजनासप्रमाणे होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here