९ वे एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोकमंगलमध्ये आयोजन !

0

अनिल वीर सातारा : येथील लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर, एमआयडीसी कोडोली येथे शनिवार दि.२१ रोजी संपन्न होणार आहे.  येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्यावतीने व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे, शाखा-सातारा आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित

   

 सकाळी नऊ ते एक या वेळेत संपन्न होत असून साहित्य संमेलनास संमेलनाध्यक्ष  म्हणून विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉ. सोनम जाधव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, अ. भा. म.ना. प. शाखा सातारचे अध्यक्ष शिरीष चिटणीस भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून  अ. भा. म. बा. सा. संस्था पुणे, शाखा साताराच्या अध्यक्षा शिल्पा चिटणीस व लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संचालक सतीश पवार  उपस्थित राहणार आहेत.

यावेळी लोकमंगल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या बाबर,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका ज्योती नलवडे, अ. भा. म. बा. सा. संस्था पुणे शाखा सातारा सहकार्यवाह नंदा पवार, कोषाध्यक्ष शशिकांत जमदाडे, कार्यवाह भगवान जाधव, उपाध्यक्ष अभिजित वाईकर, इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक ज्ञानेश्वर मोहटकर, उपशिक्षक संदीप जाधव, हणमंत खुडे आदी उपस्थित राहणार आहेत. या बालकुमार साहित्य संमेलनात काव्यवाचन, श्लोक पठण, बडबडगीत, कथाकथन तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here