🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
- आहारामध्ये साखर कमीत कमी घ्यावी.
- टायफॉईडमध्ये फळे सालासकट खाण्यापेक्षा फक्त फळांचा रस घ्यावा. विशेषता: गोड डाळिंबाचा रस, सफरचंदाचा रस अतिशय उपयोगी आहे.
- घन आहार घेण्यापेक्षा जुन्या तांदळाच्या भाताची पेज, खिमटी, खिरी असा आहार घ्यावा.
- पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्यापेक्षा त्यांचे सूप घ्यावे. या हलक्या आहारांमुळे आतड्यांना ताण न येता पोषणही व्यवस्थित होते.
- टायफॉईडच्या तापामध्ये चहा, कॉफी घेण्यापेक्षा आवळा सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत घ्यावे हे तीनही सरबत मरगळ, अशक्तपणा दूर करून तरतरी आणतात. शिवाय आतड्यांची सूज, आतड्यांमधील जखमा ब-या करण्यासाठी यांचा उपयोग होतो.
- साळीच्या लाह्या पाण्यामध्ये भिजवून ते पाणी घ्यावे हे साळीच्या लाह्यांचे पाणी पचण्यास अतिशय सुलभ असून लगेच शक्ती प्राप्त करून देते.
- दुपारी ताजे गोडसर तक व त्यात जिरेपूड, कोथिंबीर घालून प्यावे. ताजे गोडसर ताक हे आतड्यांचे अमृत आहे.