डॅा. सुभाष जोशी आणि डॅा.दत्ता भराड डॅा.खासबागे मानव सेवा पुरस्काराने सन्मानित 

0

बुलडाणा(प्रतिनिधी)- बुलडाणा येथील स्वर्गीय डॉ.अरुण खासबागे मानव सेवा पुरस्कार गेल्या दहा वर्षा पासून त्यांची मुले प्रेम आणि आशिष चालवत आहे. डॉ.अरुण खासबागे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात जे सेवाभावी सेवा देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा पुरस्कारचे २०२५ चा वितरण सोहळा वालसावगीचे मुळ निवासी असलेले बुलडाणाचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.सुभाष मुरलीधर जोशी, चिखली येथील डॉ.दत्ता गणपत भराड यांना देण्यात आला . इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजित शिरसाट,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी, संजयजी बोथरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या कार्याचा शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट गुणांनी एमडी रेडिओलॉजी उत्तीर्ण झालेल्या डॉ.शिवानी बोथरा शाल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पुरस्कार वितरणाचा उद्देश व पुरस्कार वितरणाचे निकष डॉ.आशिष खासबागे यांनी विषय केले. आपल्या मनोगतातून डॉक्टर परिहार यांनी डॉ. जोशी व डॉ.दत्ता भराड यांच्या वैद्यकीय सेवेचा व सामाजिक बांधिलकीचा उपस्थितांना परिचय करून दिला तसेच डॉ. बोथरा यांनी वैद्यकीय सेवेची आव्हान याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.भागवत भुसारी यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना डॉ.भराड यांनी मला माझ्या गुरुच्या नावाने पुरस्कार मिळाला ही पुंजी मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील असे भावनिक उदगार काढले तसेच डॉ.जोशी यांनी हा माझा सत्कार नसून माझ्या प्रत्येक रुग्णाचा सत्कार असल्याचे नमूद केले. आपल्या अध्यक्ष भाषणात डॅा. शिरसाठ यांनी डॉक्टर खासबागे यांनी आम्हाला वैद्यकीय सेवेचा मूलमंत्र दिला तो आम्हास प्रेरणादायी राहील या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रमेश आराख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रेम खासबागे यांनी केले. सदर कार्यक्रमाला डॉ.उकार्डे,डॉ.भागवत, डॉ.पुंडकर,डॉ.स्वप्नील भराड,डॉ.परीहार,डॉ.शिवानी बोथरा,डॉ.सुनिता बोथरा,दैनिक सम्राट,दै.सामपत्र चे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब जाधव,दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी हर्षानंदन वाघ,आर्यन खासबाग, डॉ.वर्षा खासबागे,सुचेता खासबागे,कबीर खासबागे,मुरलीधर भोपळे,पीएसआय पाटील ,अविनाश काळे, डॉ.कुलकर्णी ,विकी चव्हाण, चंद्रशेखर जोशी,डॉ.श्रीराम जोशी,गजानन शिरसागर,डॅा.कोथळकर या पुरस्कार वितरण सोहळ्याला शहरातील व शहराबाहेरील शिक्षण,वैद्यकीय,पत्रकारिता विधीक्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here