उत्कृष्ट चर्चासत्रातील सहभागाबाबत आयएमए नांदेड च्या वतीने सर्वांचे आभार
नांदेड – प्रतिनिधी दि.२०
येथील आयएमए च्या वतीने दि.१८ व १९ जानेवारी रोजी एमजिएम इंजीनीरिंग कॉलेज येथे राज्यस्ततरीय दोन दिवसीय वैद्यकीय कायदेविषयक परिषदेचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले या परिषदेचे उद्घाटन आयएमए महाराष्ट्रा च अध्यक्ष डॉ संतोष कदम यांच्या हस्ते करण्यात आले तर.उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल चे अॅडमिनिस्ट्रेटर श्री. विनकी रघुवणी ,शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ सुधीर देशमुख ,महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल चे माजी अध्यक्ष डॉ शिवकुमार उतुरे,यशवंतराव चव्हाण आरोग्य विद्यापीठ नाशिक चे माजी कुलगूर डॉ दिलीप म्हैसेकर ,माजी राज्य सदस्य डॉ संजय कदम,आयएमए चे मेडिकोलीगल चेअरमन डॉ विपिन चेकर , को चेअरमन डॉ अजय नारायंकर ,नांदेड आयएमए चे अध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर ,सचिव डॉ राहुल लव्हेकर ,खजिनदार डॉ राजेश तगडपल्ले ,व या परिषदेचे सचिव डॉ सचिन चांदोलकर ,आणी चेअरमन डॉ सुनील मसारे यांच्यास सहभाग नोंदविलेल्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिषदेत भारत भरातील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञ, कायदे तज्ञ, पोलीस अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातील नामांकित सदस्य यांनी सहभाग घेतला. परिषदेचे उद्दिष्ट वैद्यकीय व्यावसायिकांना कायद्याच्या महत्त्वपूर्ण बाबींबद्दल जागरूक करणे आणि वैद्यकीय आणि कायदेशीर क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करणे हे होते.या परिषदेमध्ये सादर केलेल्या शोधनिबंधांनी आणि चर्चांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनुत्तरित प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला .
या परिषदेमध्ये वक्ते आणी चर्चा सत्र या मध्ये डॉ राजेश डेरे,डॉ सचिन चांदोलकर,डॉ नितीन धानडे ,डॉ मयूर सरोदे ,डॉ. मनिषा जगताप ,डॉ मारोती डाके, वकील आशीष खतोड ,डॉ कपिल मोरे ,डॉ अनिल देगवकर,डॉ सुनील मसारे,डॉ अजय नारायांकर ,डॉ शिवकुमार उतुरे ,डॉ सुप्रिया पंडित,डॉ किशोर आतनुरकर ,डॉ दिनेश प्रतापवर,डॉ बंदीउद्दीन ,डॉ मनीष देशपांडे,डॉ. प्रल्हाद कोटकर,डॉ मंगेश नारवडकर ,डॉ बालाजी पूजरवाड ,वकील श्री अनिकेत अग्रवाल,डॉ संतोष काकडे ,डॉ विपिन चेकर ,डॉ वेदप्रकाश मिश्रा,डॉ गोपीनाथ शिणोय ,डॉ. राजेंद्र तिवारी,माजी न्यायाधीश श्री चिकसी,वकील चंद्रकांत जहागीरदार,नांदेड चे पोलिस अधीक्षक श्री अबिनाश कुमार,डॉ. संजय कदम,डॉ अंजली डावले,डॉ. राहुल लव्हेबर,डॉ. निकिता पाटील,डॉ शिल्पा दयानंद आदिनी सहभाग नोंदविला.
परिषदेच्या समारोप सत्रात, डॉ शिवकुमार उतुरे आणी डॉ संतोष कदम यांनी सांगितले की, “या परिषदेने वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कायद्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण केली आहे. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांना रुग्णसेवा करताना अधिक स्पष्टता व आत्मविश्वास मिळेल.” या परिषदेतून निघालेल्या शिफारसींचे,चर्चासत्राचे दस्तऐवजीकरण आणी रेकॉर्डिंग करून पुढील धोरणात्मक पातळीवर काम करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल ला देण्याबाबत अॅडमिनिस्ट्रेटर रघुवणी यांनी सांगितले आणी तसे आश्वासन नांदेड आयएमए च्या वतीने देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड आयएमए चे अध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर यांनी सर्व सहभागी, मान्यवर, आणि स्वयंसेवकांचे आभार मानले.