सिन्नर : पातळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी बैठे आसणे व उभे आसणे, सुर्यनमस्कार हे प्रकार केले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगाची माहिती सांगुन प्रात्यक्षिके करून दाखविली.
आनापान, प्राणायाम, अनुलोम -विलोम, बस्त्रीका, मंडुकासन, ताडासन भ्रमरी, कपालभाती याविषयी स्वतः कृती करून माहिती दिली. योगामुळे आत्मविश्वास वाढतो. शरीर निरोगी राहते. योगामुळे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन व आत्मिक शांती मिळते असे सांगितले. विद्यालयात दर शनिवारी विना दप्तराची शाळा भरते. त्यावेळी विद्यार्थी जवळजवळ दीड तास आनापान,योगासने, प्राणायाम करतात. विद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भरतीसाठी बराच फायदा झाला. त्यामुळे विद्यालयाचे ३०० ते ३५० विद्यार्थी सैन्य दलात भरती झाले. विद्यालयात दररोज प्रार्थना झाल्यानंतरही किमान दहा मिनिटे आनापान घेतले जाते.
यावेळी श्याम रेवगडे, नितांशू शिंदे, संकेत रेवगडे, दर्शन वारुंगसे,अक्षय पाटोळे, रितेश रेवगडे या विद्यार्थ्यांनी योगासने प्रकार केले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख,सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.