उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे) डायबेटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट व श्री रामकृष्ण नेत्रालय व वैभव आय केअर व ऑप्टिकल, पुनाडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील पुनाडे येथे मोफत आरोग्य शिबीवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्लड प्रेशर, मधूमेह,वजन, उंची, डोळे तपासणी आदी तपासण्या करण्यात आले.नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशांत पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, विनोद म्हात्रे मनसे पूर्व विभाग अध्यक्ष, विनोद जाईलकर राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी 200 नागरिकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.