दौड रावणगाव, परशुराम निखळे :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आज दिनांक 25/1/25 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव येथे, प्रा आ केंद्र व दौड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उज्वला जाधव मॅडम व वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन पांढरे यांचा पुढाकाराने ”सुंदर माझे प्राथमिक आरोग्य केंद्र “हि संकल्पना राबवण्यात आली. प्रा आ केंद्र चा आतील कक्ष, व इतर साहित्य बाबीची स्वछता करीत परिसर सर्वोतपरी स्वच्छ करण्यात आला.
बाहेरील आवारात असणारे झाडापाला, काटेरी झुडपे, कचऱ्याचे ढीग सर्वांची योग्य ती विल्हेवाट लावत परिसर स्वच्छ करण्यात आला. संरक्षक भिंती चा आतील बाहेरील परिसर एकदम स्वच्छ झाल्याने प्रा आ केंद्र चा प्रांगणात कायलपाट झाल्याप्रमाणे स्वच्छ व सुंदर आरोग्य केंद्र दिसून येत आहे. यासाठी ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.
या स्वछता मोहिमेत वैद्यकीय अधिकारी यांना त्यांचे आरोग्य केंद्राचे सर्वं आरोग्य कर्मचारी, औषधं निर्माण अधिकारी, कलर्क HA LHV ANM MPW BF,DO, अर्धवेळ कर्मचारी,चालक, परिचर आणि आशा स्वयंसेविका या सर्वांनी सहकार्य केले. आपले आरोग्य केंद्र सुंदर बनवणे हि एकच भावना घेऊन सर्वांनी वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदान केले. नियोजन बद्ध नियोजन व मनापासून श्रमदान केले तर कुठले हि काम अशक्य नाही व पुढे हि प्रा आ केंद्र आणि परिसर कायमच स्वच्छ राहिल याकडे जातीने लक्ष दिलें जाईन असे प्रतिपादन डॉ यांनी केले.