७२ वर्षीय रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे यशस्वी बिना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया…

0

इंटरव्हीशनल कार्डियालॉजिस्ट डॉ. सी रघु आणि डॉ. सुमित शेजोल यांचे यश..!
नांदेड – प्रतिनिधी
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील इंटरव्हीशनल कार्डियालॉजिस्ट डॉ.सी रघु व डॉ. सुमित शेजोल यांनी नांदेड येथील प्रसिद्ध फिजिशियन डॉ. साहेबराव मोरे यांनी संदर्भित केलेले  ७२ वर्षीय रुग्ण तथा हरिकिशनजी बजाज माहेश्वरी शिक्षण विकास संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश इंदानी यांच्यावर अत्याधुनिक विना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली.

याविषयी पत्रकार परिषेदेत सविस्तर माहीती देतांना डॉ.सी रघु व डॉ. सुमित शेजोल  यांनी सांगितले की, सदरील रुग्णास  चालताना व वेगवान हालचाल करतांना दम लागणे हा त्रास  होता त्यामुळे हृदयाच्या संपूर्ण तपासणी नंतर सदर रुग्णाच्या हृदयाच्या धामन्यामध्ये कुठलाही ब्लॉक नाही. परंतु ओरटिक वॉल (AORTIC Valve)  नावाची हृदयाची सगळ्यात महत्त्वाची झडप वयोमानानुसार निकामी झाली आहे असे निदान करण्यात आले त्यामुळे अशा रुग्णास ती झडप बदलून दुसरी झडप लावणे हा एकमेव पर्याय आहे.

वयोमान जास्त असल्यामुळे आणि ओपन हार्ट सर्जरी रिस्क असल्यामुळे वरील रुग्णास अत्यावश्यक अशा ट्रान्सकॅथेटर महाधमनी वाल्व इम्प्लांटेशन (TAVI) या शस्त्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली.
या शस्त्रक्रियेत ओपन हार्ट सर्जरी न करता पायाच्या धमन्यामध्ये छोटे छिद्र करून ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात येते  त्यामुळे शरीरावर कुठल्याही प्रकारचा टाका न लागल्यास अतिशय कमी त्रासामध्ये ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णास दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात येते अशी माहीती डॉ.सी रघु व डॉ. सुमित शेजोल यांनी दिली ..

पुढे त्यांनी सांगितले की , ओमप्रकाश इंदानी यांच्यावर टावी शस्त्रक्रिया ही सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल चे इंटरव्हीशनल कार्डियालॉजिस्ट तज्ञ डॉक्टर सी रघु व  डॉक्टर सुमित शेजोळ यांनी पार पाडली ही शस्त्रक्रिया ११  मे २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली  टावी शस्त्रक्रिया ही अत्याधुनिक असून ज्या रुग्णास ओपन हार्ट सर्जरी सुचवलेली आहे अशा रुग्णांना या शस्त्रक्रियेद्वारे लाभ घेता येईल असे डॉक्टरांनी सांगितले .
विना टाक्याची TAVI शस्त्रक्रिया म्हणजे काय -?
या शस्त्रक्रियेमध्ये अँजिओप्लास्टी प्रमाणे पायाच्या धमन्यामध्ये छोटे छिद्र करून हे संपूर्ण ऑपरेशन करता येते त्यामुळे छातीवर कुठलेही टाके पडत नाहीत  त्यामुळे ही शस्त्रक्रिया ही कमी जोखीम असलेली आणि सुरक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here