नगर – दि. 30/08/2022 रोजी दुपारी 4.00 च्या सुमारास बशीर दिलावरखान पठाण वय 47 रा. अमिर मळा यांस प्रॉपर्टीच्या वादातून आ.क्र.1) आयुब दिलावर खान पठाण, 2) आसिफ आयुब पठाण, 3) गुलाब आयुब पठाण यांनी अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले, असा मृत्यूपूर्व जबाब बशीर दिलावरखान पठाण यांनी दिला व त्यानंतर ते मृत्यू पावले. कॅम्प पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध भा.द.वि.302, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असता, वरील तिघांनी नगर येथील जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामिन दाखल केला असता, तो नगर येथील एन.आर.नाईकवाडे अति.सत्र न्यायाधिश यांनी तो मंजूर केला होता. सदर तिघांच्या विरुद्ध मयताच्या पत्नीने औरंगाबाद उच्च न्यायालयात तो रद्द करण्यासाठी प्रकरण दाखल केले. त्याचा क्र.एसीबी 212/2022 पडला. त्याची सुनावणी नुकतीच औरंगाबाद खंडपिठात न्यायमूर्ती अवचट आर.जी. यांचे समोर होऊन त्यात अॅड.सुद्रिक यांनी आरोपीतर्फे न्यायालयाचे असे निदर्शनास आणून दिले की, सदरचा खून नसून मयताने आत्महत्या केलेली आहे, त्यामुळे उच्च न्यायालयाने सदरचा अर्ज फेटाळला व नगरच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयात सर्व आरोपीतर्फे अॅड.सतिशचंद्र सुद्रीक यांनी काम पाहिले.