अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने पकडले; दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

0

तहसीलदार सारंग चव्हाण यांची धडाकेबाज कार्यवाही 

पैठण,.३ (प्रतिनिधी) : तालुक्यातील विविध ठिकाणी वाळू चोरी करून प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन वाळू चोर पळून जात होते . महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यावर वाळू तस्कर  नजर ठेवून असतात .  तहसीलदार सारंग चव्हाण यांना पैठण पाचोड रोडवरून अवैध वाळूने भरलेले दोन हायवा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली . त्यानंतर  तहसीलदार सारंग चव्हाण हे सापळा रचत संभाजीनगर येथून खाजगी वाहनाने वाहन पकडण्यासाठी रवाना झाले .

वाळू तस्करांना खाजगी वाहनातून येत असल्याचा सुगावा लागू नये यासाठी पैठण येथून नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांच्यासह पथक पैठणहून पाचारण केले .  तहसीलदार सारंग चव्हाण खाजगी वाहनात येत असल्याचा सुगावा वाळू तस्करांना लागला नाही . त्यामुळे बिन्धास्त रविवार सुट्टीचा दिवस असल्याचा फायदा घेऊन  वाळूने भरलेले वाहन जात असताना थेरगाव येथे दोन्ही वाहनतहसीलदार सारंग चव्हाण यांनी रविवारी पहाटे पकडले . त्यांच्याकडे परवाना वाळू वाहतुकीचा नसल्याचे दिसून आल्याने सदरील वाहने जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले . चार दिवसांपूर्वी  ३० मे रोजी गुरुवार रोजी पारुंडी परिसरात वाळू भरलेला हायवा पकडून तहसील कार्यालयात जमा केला . दीड कोटी रुपयाचा मुद्देमाल तहसील कार्यालयात जमा केला . 

           गेल्या अनेक दिवसापासून पैठण तालुक्यासह विविध ठिकाणी चोरी चोरी चुपके वाळू चोरी होत असते . त्याला आळा घालण्यासाठी तहसीलदार सारंग चव्हाण नेहमी प्रयत्नशील असतात . लोकसभा निवडणुक आचार संहिता दरम्यान महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी हे निवडणूकीत कर्तव्य बजावत होते . परिणामी वाळू तस्करांनी त्याचा फायदा घेत पैठण तालुक्यात धुमाकूळ घातला . निवडणूक कामातून तहसीलदार  कार्यमुक्त झाल्यानंतर तहसीलदार सारंग चव्हाण वाळू तस्करांच्या मुसक्या अवळणार असल्याची चर्चा आहे . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here