आई वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीवर केले चाकूने वार…

0

मुलीने आपल्या इच्छे विरुद्ध प्रेम विवाह केल्याचा होता राग

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी, 

             मुलीने आपल्या इच्छे विरुद्ध प्रेम विवाह केला. त्याचा राग मनात धरुन आई वडिलांनी आपल्याच मुलीवर चाकूने वार करून लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कात्रड येथे दि. १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. 

           समृध्दी केतन घुंगरकर, वय १८ वर्षे, रा. कात्रड, ता, राहुरी, या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, समृद्धी घुंगरकर या तरुणीने आई वडिलांच्या इच्छे विरुद्ध जाऊन केतन घुंगरकर, रा. कात्रड, या तरुणाशी दि. १७ मार्च २०२५ रोजी प्रेम विवाह केला. त्यानंतर समृद्धी घुंगरकर ही तरुणी दि. १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान तीच्या सासरच्या घरी असताना तेथे तिचे आई वडील व इतर आरोपी आले. त्यावेळी तीचे आई वडीलांनी तीला शिवीगाळ करुन म्हणाले की, तु आमचे मर्जी विरोधात लग्न करते काय? असे म्हणत स्वतःच्या  मुलीवर चाकूने वार करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच वडील म्हणाले की, मी हिला इथे नांदवु देणार नाही, मी हिचा जिव घेईल किंवा माझा जिव देईल, अशी धमकी दिली. त्यानंतर इतर आरोपींनी समृद्धी या तरुणीला शिवीगाळ करुन दमदाटी केली. 

         

 घटनेनंतर समृध्दी केतन घुंगरकर या तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी ज्योती गोरक्षनाथ गांधले, गोरक्षनाथ मच्छींद्र गांधले, विजय आण्णासाहेब तांबे, प्रतिक विजय तांबे, एकनाथ देवराव कांडेकर, सर्व रा. कात्रड, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ३८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १८९ (२), १९०, १९१ (२), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here